जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 पूर्व तयारीच्या आढावा बैठकीचे 11 मे रोजी आयोजन


A review meeting regarding preparations for the 2026 Kharif season in Jalgaon district has been scheduled for May 11 जळगाव (7 मे 2026) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026 नियोजनाबाबत आढावा बैठक सोमवार, 11 मे 2026 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात होत आहे.

या बैठकीत शेतकर्‍यांना आवश्यक असलेली गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व किटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठांची उपलब्धता, त्यांचे नियोजन तसेच गुणवत्ता नियंत्रणाबाबत उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध मोहिमा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संलग्न विभागांच्या योजनांची अंमलबजावणी यावरही चर्चा होणार आहे.



जिल्ह्यातील सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, संलग्न विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार असून, खरीप हंगाम 2026 साठी आवश्यक असलेल्या नियोजनाचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !