गांधी रिसर्च फाउंडेशनच्या बाल संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप
विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, शिस्तीचे संस्कार रुजविण्यावर भर
Conclusion of the Gandhi Research Foundation’s Child Values and Personality Development Camp वावडदा, जळगाव (7 मे 2026) : जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित बाल संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास गावचे सरपंच राजेश वाडेकर, मुख्याध्यापिका जयश्री पाटील, किशोर कुळकर्णी, अब्दुल भाई, भूषण पाटील, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, अर्जुन प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले.
मार्गदर्शन करताना राजेश वाडेकर यांनी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वावलंबी बनावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी सुट्टीच्या दिवसांचा सदुपयोग करून अभ्यासावर भर द्यावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा तसेच सुंदर हस्ताक्षरासाठी नियमित सराव करावा, असे आवाहन केले. जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.


यावेळी विद्यार्थी रुपेश चौधरी, काव्या पाटील, रोहित चव्हाण, प्रेम पाटील व पूनम मिस्तरी यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातून शिस्त, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, चांगल्या सवयी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे मिळाल्याचे सांगितले. समारोपप्रसंगी विविध उपक्रमांत सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
