दुष्काळात तेरावा महिना : भुसावळात मेन पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत


भुसावळ : शहराला पाणी पुरवठा करणारी आणि तापी नदीतून पाण्याची उचल करणार्‍या मुख्य पाईप लाईनीला जीर्ण झाल्याने रेल्वे कॉलनी परिसरात मोठेच भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजता घडली, यामुळे रात्री पासून शहरातील विविध भागात होणारा पाणी पुरवठा वितरण ठप्प झाले आहे. शहरातील विविध भागात रोटेशन पध्दतीने होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवस लांबणीवर पडलेला आहे. यामुळे भुसावळकरांना आठ दिवसाआठ मिळणारे पाणी आता दहा दिवसांनी रोटेशन पूर्णत्व होत नाही तोपर्यत मिळणार आहे.

भुसावळातील 63 धार्मिक स्थळांनी घेतली ध्वनिक्षेपक वापराची परवानगी

जीर्ण जलवाहिनीची डोकेदुखी
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी नदीतून पाण्याची उचल केली जात असते. यासाठी तापी नदीतून पाण्याच्या होणार्‍या उचलसाठी मुख्य जलवाहीनी आहे. ही जलवाहीनी जीर्ण झाली असून याच जलवाहिनीतून पाण्याची उचल केली जात आहे. याचाच परिणाम म्हणून 500 मी.मी. व्यासाच्या पाईप लाईनीला मोठेच भगदाड पडल्याने पाईप लाईनीतून वाहून जाणारे पाणी हे फुटलेल्या पाईप लाईनीतून बाहेर येऊ लागले, यामुळे शहरात होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सतीश देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहाणी केली, मात्र शिवाजी नगर भागात पाणी पुरवठा केला जात होता, त्याच वेळी पाईप लाईन फुटल्याने पालिका प्रशासनाने फुटलेली पाईप लाईन असतांना सुध्दा पाण्याची उचल करून जलकुंभापर्यत पाणी पोच केले मात्र पाणी पुरवठ्याला दाब नसल्याने शिवाजी नगर व परिसरात करण्यात आलेला रात्रीचा पाणीपुरवठा हा कमी दाबाने करण्यात आला. मात्र सकाळपासून ज्या भागात पाणी पुरवठा वितरण होणार होते, त्या भागातील पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्या भागातील लोक पाण्याची वाट पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळयाचे दिवस असल्याने पाण्याची नितांन गरज आहे. मात्र असे असतांनाही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पाणी केव्हा येईल या विवंचनेत नागरिक पाण्याची वाट पहात आहे.



पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात 

या भागातील पाणी पुरवठा बंद
मंगळवारी रात्री पाईपाला भगदाड पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे बुधवारी सहकार नगर, शारदा नगर, शांती नगर, वसंत टॉकीज परिसर, श्रीराम नगर, वांजोळा रोड, दत्त नगर कुळकर्णी प्लॉट, गवळी वाडा आदी भागात होणारा पाणी पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे या परिसरातील लोकांकडून पाण्यासाठी वाट पाहिली जात होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !