Annasaheb M. K. Patil माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील म्हणाले : ग्रीन एनर्जीच्या विविध प्रकल्पांसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 450 कोटींचा निधी मंजूर


Annasaheb M. K. Patil चाळीसगाव : देशात ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन दिले जात आहे. देशाच्या बजेटमध्ये ग्रीन एनर्जीसाठी सुमारे 40 हजार कोटी रूपयांची तरतूद केली असून विविध सवलती दिल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यात 450 कोटी व चाळीसगाव तालुक्यात ग्रीन एनर्जीच्या विविध प्रकल्पांसाठी सुमारे 225 कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा इंडियन फेडरेशन ग्रीन एनर्जीचे मुख्य प्रवर्तक एम.के.पाटील (Annasaheb M. K. Patil) यांनी दिली.

निकृष्ट पोषण आहार ; भुसावळात गोदाम सील 

चाळीसगावसाठी 225 कोटी
बँकांकडून अडवणूक, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे या ग्रीन एनर्जीच्या उत्पादनाला गती मिळत नाही. देशातील विविध बँकांनी फायनान्स उपलब्ध करून दिले नाही. विविध राज्यात धोरण, नियोजन नसेल तर ग्रीन उर्जा संसाधने मिळवण्यासाठी, उत्पादन, प्रकल्प सुरू करण्यासाठी अडथळे निर्माण होवू शकतात असे ते म्हणाले. इंडियन फेडरेशन ग्रीन एनर्जीमध्ये 2030 पर्यंत 20 टक्के वाढ अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यात ग्रीन एनर्जीच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांसाठी 225 कोटी रूपये सहा टक्के व्याज दराने मंजुरी देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी (Annasaheb M. K. Patil) यावेळी दिली.



ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची ही असेल भूमिका : मंत्री छगन भूजबळांनी स्पष्ट शब्दात सांगितले

रोजगारात होणार वाढ
नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली जी उर्जा असते तीला ग्रीन उर्जा म्हटले जाते. जसे सुर्याच्या किरणापासून निर्माण होणारी सोलर उर्जा, पाण्याच्या लाटांपासून तयार होणारी हायड्रोजन उर्जा, उसाच्या चिपाड, पाचट पासून इथेनॉल बनविले जाते. वनस्पतीपासून, मोहाच्या फुलापासून, बि बियांच्या माध्यमातून बायोडिझेल अशा प्रकारे ग्रीन एनर्जीमुळे बायोडिझेल, बायोगॅस, सीएनजी सोलर, हायड्रोजन उर्जा आदी साधने उपलब्ध होवून इलेट्रीक वाहनांच्या माध्यमातून वाहतूक दळणवळण शाश्वत पर्यावरण पूरक संरक्षण व्यवस्था निर्माण होईल. त्यातून देशात प्रदुषण कमी होवून हवामानात बदल होईल व शेती उत्पन्न वाढून उद्योग व्यवसायात वृध्दी होवून रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होवून नोकर्‍या निर्माण होतील असे पाटील (Annasaheb M. K. Patil) म्हणाले.

ऐनपूर खुनाने हादरले : उधारीच्या पैशांवरून तरुणाचा खून 

केंद्राला अहवाल सादर
एम. के. पाटील (Annasaheb M. K. Patil) यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अध्यक्ष एम. के. पाटील, सल्लागार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र पांडे, माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सुलजा मोटवानी, इंडियन फेडरेशन ग्रीन एनर्जी ही संघटना तसेच केंद्र सरकारचे मंत्री यांचा सहभाग असलेल्या इंडियन फेडरेशन ग्रीन एनर्जी संघटनेचा संवाद कार्यक्रम 2 मे रोजी दिल्लीतील हॅबीटेड सेंटरमध्ये पार पडला. यात कारखानदार, उद्योजक, शास्त्रज्ञ, शेतकरी, संघटनेचे प्रतिनिधी असे 300 जण सहभागी झाले होते. या परिषदेत आपण केंद्र सरकारला अहवाल सादर करून अडचणींबाबत उहापोह केल्याचे त्यांनी (Annasaheb M. K. Patil) सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !