डॉक्टरांना भामट्यांनी घातला 49 हजारांचा गंडा
जळगाव : बँकेतून बोलत असल्याचे सांगून शहरातील एका डॉक्टरांची 49 हजारात ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विश्वास संपादन करीत घातला गंडा
जळगाव शहरातील जोशी पेठेतील डॉक्टर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वैद्यकीय सेवा देवून आपला उदरनिर्वाह करतात. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांना 8114175173 क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून 49 हजार 312 रूपये भरावे लागतील असे सांगून डॉक्टरला ओटीपी नंबर बोलण्यात फसवणूक करून विचारून घेतला. त्यानंतर लागलीच डॉक्टरच्या खात्यातून 49 हजार 612 रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने रविवार, 8 मे रोजी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.