जिल्हा पोलिस दलाकडून सर्व धर्म समभावाचा संदेश : मानवाधिकार फाऊंडेशनने मानले आभार


भुसावळ : भोंग्यावरून देशात राजकारण पेटले असतानाच नागरीकांमध्ये जातीय व धार्मिक सलोखा कायम रहावा तसेच जिल्ह्यातील, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी व सर्व नागरीक पोलिस दलासोबत असावेत या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून स्वाक्षरी मोहिम जिल्हा स्तरावर राबवण्यात आली व त्यास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत भुसावळातील आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष मयूर अंजाळेकर यांनीदेखील सहभाग नोंदवला. जिल्हा पोलिस दलाच्या स्तुत्य उपक्रमाचे अंजाळेकर यांनी कौतुक करीत याबाबत आभार मानणारे पत्र पोलिस दलासह जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे.

असाच टिकून रहावा जातीय सलोखा
सर्व, धर्म समभावाचा संदेश देण्यात आल्यानंतर जातीय सलोखा राखण्यास मोठी मदत झाल्याने जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे मानवाधिकार फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष मयूर अंजाळेकर यांनी आभार मानले आहेत. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांचदेखील अंजाळेकर यांनी पत्राद्वारे आभार मानले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !