भोकर नदीत बुडाल्याने दोन्ही सख्ख्या भावंडाचा करुण अंत


घोड्याला धुण्यासाठी नदीत उतरल्याने दुर्घटना

रावेर : तालुक्यातील पुनखेडा गावाजवळ असलेल्या भोकर नदीत घोड्याला धुण्यासाठी उतरलेल्या दोन्ही सख्ख्या भावंडाचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आसीफ खान मजीत खान (16) व समीर खान माजीत खान (13, रा.रावेर) अशी मयतांची नावे आहेत. दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता कुटुंबियांना कळताच त्यांनी हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मोठी गर्दी झाली होती.

लहान भावाला वाचवताना मोठ्याचाही मृत्यू
शहरातील अहमद रजा कॉलनीतील मजीद खान यांचा घोडागाडीचा व्यवसाय आहे. ते घरात नसतांना त्यांची मुले आसीफ खान मजीत खान (16) व समीर खान मजीत खान (13) हे शहरापासून पाच किलोमीटर अंतररावर असलेल्या भोकरी नदीवर घोड्याला धुण्यासाठी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास भोकर नदीत घोडा धुत असतांना लहान भाऊ समीर खान नदीपात्राच्या पाण्यात उभा असतांना त्याचा पाय घसरल्याने तो बुडू लागताच त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ आसीफ खान सरसावला मात्र तो देखील पाण्यात बुडाला. दोघा भावंडांना पाण्याबाहेर काढल्यानंतर रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याबाबत रावेर पोलिस स्थानकात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार नाईक व फौजदार सुनील कदम व सहकारी तपास करीत आहे.त



प्रवासी वाहतूक करून चालत होता उदरनिर्वाह
मजिद खान हे शहरातील रजा कॉलनीत वास्तव्यास असून त्यांच्या घरची आर्थिक परीस्थिती हालाकीची आहे. घोडागाडीवर प्रवासी वाहतूक करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. या दुदैवी घटनेत त्यांच्या शिक्षण घेणार्‍या दोघा मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. दम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !