!-- afp header code starts here -->

वरणगावातून ट्रॅक्टर लांबवले : जळगावातील आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

ट्रॅक्टर केले जप्त : दोन्ही आरोपींचा वरणगाव पोलिसांकडे ताबा


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून ट्रॅक्टर लांबवणार्‍या जळगावातील दोघा आरोपींच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून चोरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. आकाश संजय पाटील (अधिकारी निवासस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव) व गणेश राजेंद्र शिंदे (हरीविठ्ठल नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी वरणगाव येथून ट्रॅक्टर चोरीची कबुली दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर अंभोरे, नाईक विजय पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील पंकज शिंदे आदींच्या पथकाने आरोपींच्या पिंप्राळा भागातून मुसक्या आवळल्या.

जळगावातील खुनाला वादाची किनार : काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !