आदिशक्ती मुक्ताईला महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्टीटद्वारे केले अभिवादन
मुक्ताईनगर : आदिशक्ति मुक्ताबाई यांचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी (725 वे) वर्ष अंतर्धान सोहळा बुधवार, 25 मे रोजी वैशाख वद्य दशमी मुहूर्तावर असल्याने संत नगरी कोथळी मुक्ताईनगर येथे पंढरीश परमात्मा, रुख्मिणी माता, नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका व लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. याच अनुषंगाने प्रत्येक मुक्ताईनगर नागरीक, युवक, महिला भगिनी यांनी व्हॉटस्अॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल साईट पोस्ट टाकली होती. संत मुक्ताई अंतर्धान सोहळा अभिवादनाचीप पोस्ट मुक्ताईनगरातील युवक गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंटवर ट्विट केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रिट्विट करून मुक्ताईला अभिवादन केले.
???????? https://t.co/JO1HXNnOPS
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 25, 2022

वारकर्यांसह भाविकांना शुभेच्छा
गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंटवर ट्विट केलेली पोष्ट बॉलीवूडचे महानायक व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अकाऊंटवर रिट्विट करून आदिशक्ति मुक्ताईला अभिवादन करीत तमाम वारकरी व भाविकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
आदिशक्ती मुक्ताईचा अंतर्धान सोहळा उत्साहात







