एमपीएससी परीक्षेत आलेल्या अपयशानंतर जळगावातील तरुणाची आत्महत्या
जळगाव : शहरातील आहुजा नगर नगरात बहिणीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणाने नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या केली. तरुणाचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न भंगल्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून तरुणाने आत्महत्या केली. महेंद्र देविदास पाटील (22, रा.आनोरे ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

बंद घर पर्वणी : उमवि विद्यापीठ कर्मचार्याच्या घरातून चार लाखांचा ऐवज चोरीला
स्पर्धा परीक्षेतील अपयशाने उचलले टोकाचे पाऊल
अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र पाटील हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिण भारती व मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. रविवार, 22 मे रोजी महेंद्र याची बहिण व मेव्हणे आनोरे गावात लग्नाला गेले होते. महेंद्र यास त्याची बहिण भारती यांनी मंगळवार ीफोन केला मात्र बिझी असल्याने संपर्क होवू शकला नव्हता त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होते मात्र फोन लागत नव्हता. त्यामुळे भारती यांनी जळगावातील त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता, दरवाजा आतून लावलेला होता, दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी संपर्क केला.
तालुका पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिसस उपनिरीक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी धाव घेतली. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असतात महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानुसार दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आल. व जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.
गोल हुकल्याने टोकाचा निर्णय : सुसाईड नोट जप्त
आई-वडील देवासारखे आहे, जीवन गोल आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केल. माझे गोल वेगळा आहे पण माझ्या सोबत अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असा मजकूर लिहून शेवटी महेंद्र याने आई वडिलांचे आभार मानले आहेत. सुसाईड पोलिसांनी जप्त केली आहे.
नवरा व दिरात कमालीचे साम्य : संधी साधत वहिनीवर वारंवार केला अत्याचार







