!-- afp header code starts here -->

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू उद्यापासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर

भुसावळात प्रहार पक्षातर्फे भरगच्च कार्यक्रम : स्वागतासाठी दुचाकी रॅलीही निघणार


भुसावळ : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार, 27 व शनिवार, 28 रोजी दोन दिवस जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यातर्फे शुक्रवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री महोदयांच्या स्वागतानिमित्त शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता जामनेर रोडवरील साई मंदिर ते यावल रोडवरील सेंट अलॉयसीस शाळेपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

उद्या भुसावळसह जळगावात विविध कार्यक्रम
मंत्री बच्चू कडू हे शुक्रवार, 27 मे 2022 रोजी सकाळी आठ वाजता अमरावती येथून निघालयानंतर जळगावातील निलेश बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट देतील, सकाळी 10 वाजता त्यांचे भुसावळात आगमन होईल त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलिस प्रशासन यांच्यासोबत प्रांताधिकारी कार्यालयात बैठक होईल, दुपारी 12 वाजता
प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या न्यू एरीया वॉर्डातील निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी एक वाजता प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी 1.30 वाजता प्रहार जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी 1.50 वाजता विनोद कदम यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी दोन वाजता दीपनगर वीज निर्मिती केंद्रात कामगारांच्या समस्यासंदर्भात बैठक, दुपारी 3.10 वाजता साईबाबा मंदिर दर्शन व दुपारी 3.30 वाजता साईबाबा मंदिर ते अलॉयसीस स्कूलपर्यंत बाईक रॅली व रोड शो, सायंकाळी पाच वाजता अकलुदला कार्यकर्ता मेळावा व अपंगांना साहित्य वाटप करण्यात येईल.

यावल शहरात सायंकाळी रोड शो
सायंकाळी 5.30 वाजता मंत्री बच्चू कडू यांचे यावलमध्ये आगमन झाल्यानंतर बोरावल गेटवर स्वागत तसेच सायंकाळी 5.45 वाजता बोरवाल गेट ते सिनेमा टॉकीज रोड शो, सायंकाळी 6.30 वाजता सुदर्शन सिनेमा टॉकीज,जवळ प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता मेळावा व जाहिर सभा, रात्री आठ वाजता फैजपूर शहरात आगमन व स्वागत समारंभ, रात्री 8.10 वाजता फैजपूर येथून रावेरकडे प्रयाण, रात्री नऊ वाजता रावेरात आगमन व योगेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट, रात्री 9.30 वाजता जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट, रात्री 10.30 वाजता बुद्ध विहारात मुर्ती स्थापना व प्रहार युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम यांच्या पिंप्री, ता.रावेर येथील निवासस्थानी भेट तसेच शनिवार, 28 मे 2022 रोजी सकाळी सात मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने खांडवी मार्गे जामोद, जि.जळगावकडे प्रयाण मंत्री करतील.

चार गावठी कट्टे व पाच जिवंत राऊंडसह हरीयाणातील शस्त्र तस्कर नरडाणा पोलिसांच्या जाळ्यात


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !