!-- afp header code starts here -->

Bhusawal-Boisar Bus Accidant भुसावळ-बोईसर बस वाघोबा खिंडीतील दरीत उलटली : 20 प्रवासी जखमी


Bhusawal-Boisar Bus Overturns In Waghoba Gorge: 20 Passengers Injured ठाणे : भुसावळहून बोईसरला जाणार्‍या एसटी महामंडळाच्या रातराणी बसला पालघर नजीक वाघोबा खिंडीत उलटून अपघात (Bhusawal-Boisar Bus Accidant) झाला. या बसचे चालक नाशिक येथे बदलण्यात आले होते. चालकाने मद्यपान केले असून भरधाव वेगाने बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. भरधाव वेगात असल्यानेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भल्या पहाटे शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पालघर नजीक असलेल्या वाघोबा खिंडीतील खोल दरीत बस कोसळली, असा दावा या अपघातात जखमी प्रवाशांनी केला आहे.

भुसावळ पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

15 ते 20 प्रवासी जखमी
राज्य परीवहन मंडळाची भुसावळ-बोईसर बसला शुक्रवारी सकाळी खोल दरीत उलटून अपघात (Bhusawal-Boisar Bus Accidant)झाला. या अपघातामध्ये सुमारे 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकार्‍यांची धाव
अपघातस्थळी महसूल, पोलीस आणि एसटी महामंडळ अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य करीत जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावदा सा.बां.विभागाला महावितरणचा शॉक : 12 हजारांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा केला कट

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !