भुसावळातील शिवसेना पदाधिकार्यांकडून खासदार धैर्यशील माने यांचे स्वागत
भुसावळ : भुसावळ दौर्यावर आलेले कोल्हापूरातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचे स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. भुसावळ तालुक्यात शिवसेना संपर्क अभियान राबवले जात असून त्यासाठी खासदार माने दौर्यावर आहेत. शहरातील एक हॉटेलात त्यांनी पदाधिकार्यांची बैठक घेत संवाद साधला. प्रसंगी कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी नमा शर्मा यांच्यासह माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, जळगावचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, अरुण सालुंखे, मनोज पवार 2022 शिवजयंती सम्मान चिन्ह, शाल, श्रीफळ तसेच चाँदीची प्रतिमा भेट देत खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार केला. प्रसंगी महिला आघाडी संपर्क प्रमुख उषा मराठे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, शिवसेना संपर्क अभियान संपर्क प्रमुख राकेश कांबळी, गिरीश विचारे, संजय बच्छाव, आबासाहेब पतंगे, मिलिंद धनकुरकर, नंदू राणे, संदीप चरफडे, मिलिंद रावराणे, राकेश भाटकर, विलास रेडकर, अजीत आझम, बबन धीरोडकर, सहदेव तारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणात आर्यन खानला क्लीनचीट







