भुसावळ शहरातून वेगवेगळ्या भागातून दोन दुचाकी लंपास
भुसावळ : शहरातील विविध भागातून चोरट्यांनी दोन दुचाकी लांबवल्या. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोन भागातून दुचाकी लंपास
शहरालगत असलेल्या महामार्गावरील आयटीआयजवळ असलेल्या रेल्वे पूलाखाली कृष्णाकुमार रामसेवक वाल्मीक (रा.रेल्वे कृष्ण कॉलनी, भुसावळ) यांनी गुरुवार, 26 मे रोजी दुचाकी (एम.एच.19 बी.आर.1985) लावली असता चोरट्यांनी ती लांबवली. शुक्रवारी वाल्मीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 हजार रूपये कींमतीची मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उमाकांत पाटील करीत आहे.

वांजोळा रोडवरूनही दुचाकी लांबवली
शहरातील वांजोळा रोड येथील आदित्य लॉनच्या भिंतीच्या कोपर्यावर कल्पेश भरतसिंग चौधरी (रा.खडका रोड, विवेकानंद नगर, भुसावळ) यांनी दुचाकी (एम.एच. 19 सी.एन. 5487) लावली असता चोरट्याने शुक्रवार, 20 मे या दिवशी रात्री 8.45 ते रात्री 11 वाजेच्या सुमारास दुचाकी लांबवण्यात आली. शुक्रवारी रात्री 9.21 वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निलेश चौधरी करीत आहे.
तरडीजवळ भीषण अपघात : अकोल्यातील दोघे ठार







