!-- afp header code starts here -->

विश्रामजीन्सी भागात शेत नांगरतांना ट्रॅक्टर उलटले : अल्पवयीन चालकाचा मृत्यू


रावेर : शेत नांगरत असतांना ट्रॅक्टर उलटल्याने 15 वर्षीय अल्पवयीन चालकाचा मृत्यू झाला. रविवार, 29 रोजी सकाळही ही घटना घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंप्राळा शिवारात बंद घर फोडून 20 हजारांचा ऐवज लांबवला 

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले
रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी भागात घुबड्या जंगलामध्ये शेकरी हरदास शंकर राठोर यांच्या शेतामध्ये शेताची मशागत दलसिंग घ्यालसिंग भिलाला (15) हा अल्पवयीन चालक ट्रॅक्टरद्वारे करीत होता मात्र वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर शेताला लागून असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबले जावून चालक दलसिंग भिलाला जागीच ठार झाला. शेत मालक हरदास राठोर यांच्या खबरीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व पोलिस सहकारी करीत आहे.

एज्युकेशन फॉर यु कंपनीच्या माध्यमातून नागरीकांना कोट्यवधींचा गंडा ‘राजकुमार’ एलसीबीच्या जाळ्यात


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !