भुसावळात इनरव्हील नॉर्थ झोनचे चर्चासत्र उत्साहात
भुसावळ : इनरव्हील नॉर्थ झोनचा सेमिनार नुकताच रोटरी भवनात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक चेअरमन वैजयंती पाठक, पीएपी अॅण्ड ओसीएशन सीसीसीसी रश्मी शर्मा, डिस्ट्रिक व्हा.चेअरमन विमल राठी, डिस्ट्रिक सेक्रेटरी आश्विनी गुजराथी, डिस्ट्रिक आयएसओ पीडीसी वीणा वाघेला होते. इनरव्हील क्लब नॉर्थ झोनमधील आठ क्लबला आमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी क्लबच्या पीडीसी रत्नकांता अग्रवाल यांना ऑनर एक्टीव्ह मेंबरची पीन लाऊन रश्मी शर्मा यांनी सन्मानीत केले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीसाने सन्मान
डिस्ट्रिक चेअरमन वैजयंती पाठक यांनी उपस्थित महिलांना पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याची पद्धत सांगितली. क्लबच्या आयएसओ रुचीका शर्मा यांनी सर्व झोनसाठी क्लबतर्फे नृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धांचे आयोजन केले.प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना बक्षीस व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मध्येच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी दिली त्यांना देखील क्लबतर्फे गौरवण्यात आले. प्रा.वसंत खरे, प्रा.आनंद केळकर यांनी पाण्याबद्दलचे महत्व सांगितले. कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती देव, सचिव वंदिता पारे, आयएसओ रुचिता शर्मा, सीसी अल्का भटकर, कमल सचदेव, शीतल भराडीया, रजनी सावकारे, नूतन फालक, डॉ.संगीता चांडक, वंदना चांडक, रत्नकांता अग्रवाल, शशीकला लाहोटी, राजेश्री कात्यायणी, शशी लाहोटी, मनिषा वानखेडे, रश्मी शर्मा, आशा पाटील, अतीया अन्सारी, कांचन जोशी, सविता शुक्ला, सुनंदा भारूडे यांनी परीश्रम घेतले.



