राज्यसभेतील तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित : माजी मंत्री गिरीश महाजन
रावेर : राज्यसभेतील तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित असून विजयाची सूत्र मी आत्ताच सांगणार नाही. भाजपाचे तिसरे उमेदवार महाडीकांना विजयी करण्यात माझीदेखील छोटीशी भूमिका असणार असल्याचे सुतोवाच माजी मंत्री गिरीष महाजन Girish Mahajan) यांनी येथे केले. ओंकारेश्वर येथे भाजपा पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री महाजन (Girish Mahajan) बोलत होते.
बापच निघाला हैवान : पोटच्या मुलीवर सतत 11 वर्ष अत्याचार
भविष्यात शिवसेनेकडे केवळ पश्चाताप
महाजन Girish Mahajan) यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र केले. भविष्यात शिवसेना पक्ष खूप पश्चाताप करेल, त्यांना पुढे ना भगवान राम वाचवु शकतो ना हनुमान वाचवु शकतो तर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याचे बोचरी टिका त्यांनी केली. दरम्यान, या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सखोल चचौ करण्यात आली तसेच पक्ष संघटन, बुथ रचनेवर चर्चा करण्यात आली. खासदार रक्षा खडसे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, भाजपा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भरत महाजन, किसान सभेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, भाजपा तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी सभापती कविता कोळी, जुम्मा तडवी, हरलाल कोळी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, वासु नरवाडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी मेळाव्याला उपस्थित होते.
किरकोळ वादातून पहूरच्या व्यावसायीकावर चाकू हल्ला







