!-- afp header code starts here -->

आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा : खासदार रक्षा खडसे

बोदवड येथे भाजपाची विस्तृत आढावा बैठक


बोदवड : आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराची विस्तृत आढावा बैठक नुकतीच अग्रसेन भवनात झाली. निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केले. या बैठकीत जिल्हा परीषदेच्या दोन गटांचा आढावा व चार पंचायत समिती गणांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन, तालुक्यातील बुथ रचना व आगामी सेवा व शासन पंधरवड्यात करायचे कार्यक्रम व आगामी येणार्‍या निवडणुका तसेच अनेक विविध विषयांवर खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव-बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी मार्गदर्शन केले.

बापच निघाला हैवान : पोटच्या मुलीवर सतत 11 वर्ष अत्याचार 

यांची व्यासपीठावर उपस्थिती
बैठकीस बेटी बचाओ बेटी पढााओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक अनंतराव कुलकर्णी, बोदवड तालुका निवडणुक प्रभारी नवलसिंग पाटील, नगरसेवक विजुशेठ बडगूजर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा चिटणीस संतोष खोरखेडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा अनिता अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग पाटील, भागवत चौधरी, मुक्ताईनगर तालुका सरचिटणी विनोद पाटील, बोदवड सरचिटणीस राजेंद्र डापसे, अमोल देशमुख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, जीवन माळी, सरचिटणीस वैभव माटे, भाजयुमो जिल्हा कोषाध्यक्ष राम आहूजा, भाजयुमो शहराध्यक्ष अभिषेक झाबक, भाजयुमो शहर उपाध्यक्ष राहुल माळी, सोशल मिडिया सह संयोजक उमेश गुरव, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस चेतन तांगडे, संजय अग्रवाल, दिलीप घुले, मधुकर पारधी, सुनिल माळी, संजय पाटील, पवन जैन,मयुर बडगुजर भारतीय जनता पार्टीचे बोदवड़ तालुक्यातील सर्व आघाड़यांचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अनेकांचा भाजपात प्रवेश
प्रसंगी मनुर बु.॥ येथील गजानन शेळके, संभाजी ब्रिगेडचे तालुका संघटक गणेश लोणारे यांच्यासह सात लोकांनी पक्षप्रवेश केला. प्रास्तविक तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी तर सूत्रसंचालन धनराज सुतार तसेच आभार प्रर्दशन उमेश गुरव यांनी मानले.

सोमवती अमावस्या चोरट्यांना पावली : अहिरवाडीत घर मालक झोपेत असताना 15 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !