वादळाने केळी भुईसपाट : प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरींचा शेतकर्यांशी संवाद : राज्यमंत्र्यांकडे भरपाईसाठी आग्रह
रावेर : रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे गारपीट व वारा वादळामुळे केळी पिकाला मोठा फटका बसला होता. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्यांच्या बांधावर प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी कार्यकर्त्यांसह पोहोचले. याप्रसंगी त्यांनी शेतकर्यांची आस्थेवाईक चौकशी केली व शेतकर्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. राज्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासनाने पंचनाम्यासह भरपाई देण्याबाबत अधिकार्यांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन यावेळी दिले.
माजी मंत्री एकनाथराव खडसेंना ईडीची नोटीस : जप्त मालमत्ता 10 दिवसात रीकामी करा
अधिकार्यांशी साधला संवाद
यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून शेतकर्यांशी बोलणे करून देण्यात आले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्ष शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत लवकरच प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे होतील व योग्य ती भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देवून शेतकर्यांना धीर दिला. दरम्यान, आपत्तीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले तसेच सर्व अधिकार्यांनी तत्काळ पंचनामे करावेत व योग्य ती मदत करावी, अशा संकटाच्या काळात शेतकर्यांना दिलासा व मदत मिळणे अपेक्षित असल्याचे चौधरी म्हणाले. यावेळी राजेंद्र महाजन, सुरेश चिंधू पाटील, अविनाश पाटील, गणेश बोरसे, वसीम शेख, पिंटू धांडे व शेतकरी उपस्थित होते.
