!-- afp header code starts here -->

जळगावातील तरुणाच्या खून प्रकरणी दोघा आरोपींना अमळनेर शहरातून अटक


जळगाव : शहरातील कासमवाडी भागातील सागर वासुदेव पाटील (26, रा.ईश्वर कॉलनी, आठवडे बाजारासमोर कासमवाडी, जळगाव) या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणी आरीफशहा अयुब शहा (छोटा सालार नगर, जळगाव) व जुबेर शेख भिका सिकलिगर (मासुमवाडी, कासमवाडी, जळगाव) यांना अमळनेर शहरातून जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे. दरम्यान, मयत सागर वासुदेव पाटील याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल असून खुनाच्या गुन्ह्यात अलिकडेच तो जामिनावर बाहेर सुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
दरम्यान, शुक्रवारी सकाळी खून झाल्याची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !