भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्याचे वाटप

शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा यांचा उपक्रम


भुसावळ : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील गोरगरीब नागरीकांना अन्न धान्याचे वाटप भुसावळ शिवभोजनचे संचालक नमा शर्मा यांनी केले. नागरीकांना लाडू भरवून पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. परीसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

भुसावळातील रेल्वे हद्दीतील विस्थापीतांना हक्काचे घरकुल मिळणारच

समाजकारणावर भर : नमा शर्मा
कोरोना काळात अनेक नागरीकांच्या हाताचे काम गेले, काहींवर उपासमारीची वेळ आली. वाढदिवसानिमित्त बॅनर व जाहिरातीवर खर्च न करता ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे, उपजिल्हासंघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख निलेश ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय सुरवाडे, हेमंत खंबायत, उपशहर प्रमुख राकेश खरारे, जवाहर गौर, विभागप्रमुख अरुण साळुंखे, नाना मोरे, गोलू कापडे, अमजद खान, अमोल भालेराव, जेष्ठ शिवसैनिक गजानन निळे, शरद जोहरे, धीरज वरढोनकार, पवन मेहरा उपस्थित होते.

सिंगतमधील ‘त्या’ तरुणाचा एलआयसी क्लेमसाठीसाठीच मित्रांनी मिळून केला खून










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !