कुर्‍हा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : अ.हाफिज अ.जिलानी विजयी


कुर्‍हाकाकोडा : कुर्‍हा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अब्दुल हाफिज अब्दुल जिलानी 403 मते मिळवून विजयी झाले तर प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवाराला 338 मते मिळाली तर नोटाचा 15 मतदारांनी वापर केला. अजगर खान हुसेन खान पठाण यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली व रविवारी मतदान झाले. सोमवारी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणी होवून अवघ्या अर्ध्या तासात निकाल हाती आला.

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांचा जल्लोष
या निवडणुकीसाठी माजी सरपंच डॉ.बी.सी.महाजन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय मुरलीधर पाटील, कुर्‍हा विकासो चेअरमन रणजीत गोयंका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष कदीरशाह फकिर, कुर्‍हा ग्रामपंचायत सदस्य शांताराम इंगळे, अनिल पांडे, विलास हिरोळे, प्रदीप पुरी गोसावी, डॉ.गजानन खिरडकर, गजानन कवळे, दादाराव हिरोळे, धनजी इंगळे, बाबाराव हिरोळे, शेख रफीक, शफीउला, शेख लूकमान, साहेब खा, महंमद शाह, भिकन ठेकेदार, सोनू इरफान मिस्त्री, शंकर मोरे, रामा खिरडकर, भैया कांडेलकर, मयूर साठे, व राष्ट्रवादी-काँग्रेस पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. निवडणीनंतर पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !