एरंडोलजवळ भीषण अपघात : ट्रेलरवर चारचाकी धडकून एक जागीच ठार


एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवानंद ढाब्याजवळ उभ्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : उद्या लागणार बारावीचा निकाल 

उभ्या ट्रेलरवर कार धडकली
एरंडोल शहरापासून जवळ असलेल्या शिवानंद ढाब्याजवळ ट्रक (सीजी 04 जेडी 0282) सोमवारी 6 जून रोजी दुपारपासून थांबलेला होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव कार क्रमांक (एम.एच. 20 सी.एस.1384) क्रमांकाची कार उभ्या ट्रेलरवर जोरदार धडकली. या कारमधील चंद्रकांत नामदेव पाटील (45, नगाव, ता.धुळे) हे जागीच ठार झाले तर त्यांचे सोबत असलेले अशोक तोरवणे (48) आणि सतीश हेमचंद्र चौधरी (47, दोघे रा.शिंदखेडा) हे गंभीर जखमी झाले.

एरडोल पोलिसात गुन्हा दाखल
अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिक तथा जिल्हा परीषदेचे नाना महाजन यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. एरंडोल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील पंकज पाटील राजेश पाटील करीत आहे.

विधान परीषद निवडणुकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवींना उमेदवारी 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !