अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाला अटक


शिरपूर : तालुक्यातील वाडी येथे 15 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी तरुणास शहर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेत सायंकाळी अटक केली. विनोद रोहिदास भिल असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
संशयित तरुणाने पीडित मुलीच्या घरात लज्जास्पद कृत्य केले. ही घटना ही 28 मे 2022 रोजी वाडी येथील पीडित मुलीच्या घरी घडली होती. याप्रकरणी 30 मे 2022 रोजी अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत होते. मंगळवारी दुपारी संशयीत विनोद भिल हा शहर पोलिस ठाण्यात आला असता त्यास ताब्यात घेत अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी पीएसआय संदीप मुरकुटे यांनी सायंकाळी दिली.

भुसावळातील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपी तरुणाला अटक










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !