आंतरजातीय विवाहानंतर वरासह पोलिसांवर हल्ला : चौघा आरोपींना अटक


भडगाव :  आंतरजातीय विवाह केल्यानंतर नवतरुण विवाहितेस तिच्या पतीसह पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता. ही घटना तालुक्यातील देव्हारी, ता.भडगाव येथे सोमवारी घडली होती. जमावातील चौघा हल्लेखोरांना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सुखदेव देवराम सोनवणे, समाधान देवराम सोनवणे, दिलीप रतन गायकवाड (रा.सर्व देव्हारी, ता.भडगाव) व रोहिदास लक्ष्मण भील (रा.बोदर्डे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चाकूच्या धाकावर विवाहितेवर अत्याचार

आंतरजातीय विवाहाच्या रागातून हल्ला
आरती बर्डे (रा.बोराडी, ता.चिखली, जि.बुलडाणा) हिचा विवाह सोमवार, 6 जूनला भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे समाधान विनायक पाटील याच्याशी होणार होता मात्र जातीबाहेर विवाह होत असल्याचे कारण पुढे करून गावातील एका गटाने हळदीच्या कार्यक्रमात हल्ला केला. समाधान पाटील हा आपल्या जातीच्या मुलीशी लग्न करत असल्याचा राग येऊन सुखदेव सोनवणे (रा.देव्हारी, ता.भडगाव) याने इतरांच्या मदतीने नवरदेव समाधान पाटील यांच्यावर हल्ला केला. सुखदेवने नवरदेवावर कुर्‍हाडीने वार करून विवाहस्थळी नासधूस केली तर नवरदेवाला पोलिस सुरक्षितस्थळी नेत असताना एका गटाने पोलिसांना धक्काबुक्की करीत वाहनावर दगड भिरकावले.

नवर्‍या मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा
या प्रकारानंतर नवरी मुलगी आरती बर्डे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत 20 ते 25 जणांविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी चौघांना अटक केली असून अन्य जमावातील इतरांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सी.बी.पालकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

धरणगावात तरुणीचे हातपाय बांधत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !