रावेरात गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुस जप्त
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
रावेर : रावेर शहरात गावठी पिस्तूल व जिवंत कडतुस विक्रीसाठी आलेल्या एकाच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळत गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतूस जप्त केले. मंगळवारी संध्याकाळी पावणे सात वाजता ही कारवाई बर्हाणपूर रस्त्यावरील ईसार पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली तर या प्रकरणी आरोपी प्रशांत जगन्नाथ सपकाळे (नेपानगर, बर्हाणपूर) याच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातील दुचाकीदेखील जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
स्थनिक गुन्हा शाखेला एक संशयीत दुचाकीवरून शस्त्र घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी संशयीत आरोपी प्रशांत सपकाळे हा दुचाकी (एम.पी.68 एम.डी.9683) वरून बर्हाणकडून रावेर शहरात शस्त्र विक्रीसाठी येत असताना होती त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी मिलिंद सोनवणे, अनिल इंगळे, सुनील दामोदरे, रमेश चौधरी, संतोष मायकल, इंद्रिस खा समशेर खा पठाण आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या कमरेला लावलेले 20 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच 35 हजार रुपये किमतीची मदुचाकी जप्त करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलि निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस नाईक मिलिंद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात आरोपी प्रशांत जगन्नाथ सपकाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




