Eknathrav Khadse कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह : राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसेंनी विधान परीषद निवडणुकीसाठी भरला अर्ज
Eknathrav Khadse मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी गुरुवारी विधान परीषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राष्ट्रवादी नेते खडसे यांना विधान परीषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खान्देशातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सोशल मिडीयातून त्याबाबतचे मेसेज व्हायरल होताना दिसून येत आहेत.
भाजपात अन्याय झाल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश : आता पक्षाध्यक्ष शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरवणार -माजी मंत्री खडसे
विविध पदाधिकार्यांची उपस्थिती
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश नेमाडे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्लीन चीट मिळूनही अन्याय
भारतीय जनता पक्षाचे बलाढ्य नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) हे 2014 साली सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद भेटल्यावर खडसेंना 12 महत्वाची खाती मिळाली. तथापि, 2016 साली मे महिन्यात त्यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. यात भोसरी येथील भूखंड खरेदी आणि दाऊद इब्राहिमच्या बायकोशी कथित संवादासह अन्य आरोपांचा समावेश होता. यामुळे 4 जून 2016 रोजी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर भोसरी भूखंड वगळता अन्य आरोपांमध्ये क्लीन चीट मिळूनही त्यांना नंतर मंत्रीपद मिळाले नाहीत. तसेच 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट देखील नाकारण्यात आले. यामुळे अस्वस्थ झालेल्या नाथाभाऊंनी ऑक्टोबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राजकीय वनवास संपणार
यानंतर काही महिन्यांनी त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठविण्यात आले. तथापि, ही यादी अजून देखील मंजूर करण्यात आलेली नाही. परीणामी गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. आता विधानसभेच्या दहा जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रसने एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांना संधी दिली आहे. त्यांच्यासह विधान परीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा संधी देण्यात ओली आहे. या माध्यमातून आता एकनाथराव खडसे यांचा राजकीय वनवास संपून त्यांचे सभागृहात आगमन होणार आहे. दरम्यान, आगामी मंत्री मंडळ विस्तारात नाथाभाऊंना संधी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे.

