Eknathrav Khadse भाजपात अन्याय झाल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश : आता पक्षाध्यक्ष शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरवणार -माजी मंत्री खडसे


मुंबई : विधान परीषदेची निवडणूक 20 जून रोजी होत असून या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने त्यांचे उमेदवार बुधवारी जाहीर केले तर गुरुवारी सकाळी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परीषदेसाठी उमेदवारांची घोषणा करीत रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांना विधान परीषदेसाठी उमेदवारी दिली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परीषद घेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. विधान परीषदेसाठी माझे नाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. गेली 40 वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम केले, विधान परीषदेसाठी आश्वासन दिले, पण बर्‍याच वेळा अन्याय झाला, अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर अशा अनेक प्रसंगामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. शरद पवार यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास सार्थ करेन आणि ज्या भागात भाजपा वाढीसाठी उभे आयुष्य काढले त्या भागात राष्ट्रवादी पक्ष वाढविणार असल्याची ग्वाही त्यांनी (Eknathrav Khadse) यावेळी दिली.

वीज तारांच्या धक्क्याने खिरोद्यात बालकाचा मृत्यू

आता पक्ष विस्तारासाठी काम करणार
खडसे (Eknathrav Khadse) म्हणाले की, ज्या भाजपच्या वाढीसाठी अपार मेहनत घेतली, गेली 40 वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो पण अन्याय होत असल्याचे पाहून नाईलाजास्तव राष्ट्रवादीत आलो. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यानुसार आता राष्ट्रवादी पक्ष विस्तारासाठी काम करणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परीषदेत सांगितले.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देण्याची बाब अत्यंत दुर्दैवी
पंकजा मुंडे यांना विधान परीषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्यावर नाथाभाऊ म्हणाले की, पंकजा मुंडेंना उमेदवारी न देणं हा जरी पक्षांतर्गत निर्णय जरी असला तरी मुंडे-फुंडकर-खडसे यांनी भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा म्हणून देण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे अत्यंत दुर्दैवी व खेदजनक असल्याचे एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) म्हणाले.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंना विधान परीषदेचे तिकिट !

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !