नोकरीच्या शोधार्थ आलेल्या 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार


मुंबई  : कलकत्ता येथून नोकरीच्या शोधात मार्च महिन्यात मुंबईत आलेल्या एका 19 वर्षीय विवाहितेवर मंगळवारी मुंबईतील कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली.

कुर्ला भागात सामूहिक अत्याचार
मंगळवारी पोलीस अधिकार्‍याने सांगितले, नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर मुंबईतील कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आला. नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोलकाता येथील रहिवासी असून मार्च महिन्यात नोकरीच्या शोधात तिच्या नातेवाईकासह मुंबईत आली होती.

नातेवाईकांनी केला अत्याचार
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या नातेवाईकासह तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !