Raid On Plastic Sellers in Amalner अमळनेरात प्लॅस्टीक विक्रेत्यांवर धाडी : 25 हजारांचा दंड वसुल
Raid On Plastic Sellers in Amalner : Fine of Rs 25,000 recovered अमळनेर : नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पाच विविध ठिकाणी धाडी टाकून प्लास्टिक विक्रेते व साठा करणार्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 25 हजार रुपये दंड केल्याने खळबळ उडाली आहे.
कारवाईने उडाली खळबळ
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आरोग्य निरीक्षक हैबत पाटील यांना आदेश देऊन बंदी असलेल्या प्लास्टिकवर कारवाईचे आदेश दिल्यानन्तर अतिक्रमण विभाग प्रमुख राध्येश्याम अग्रवाल, गणेश ब्रम्हे, श्याम करंदीकर, अनंत संदानशीव, योगेश पवार, आनंद बिर्हाडे, गौतम बिर्हाडे, महेंद्र बिर्हाडे, जगदीश बिर्हाडे ,यश लोहरे यांनी नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकून प्लास्टिक आयात व विक्री करणारे भरत सचदेव, स्टेशन रोडवर दिगंबर पाटील, सुभाष चौकात कोमल हॉटेलचे मालक लक्ष्मण छाबडीया, संदीप सुदाम पवार, भांडारकर कंपाऊंडमधील राजू जनरल स्टोअर्स यांच्याकडील प्लास्टिक जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला.
