P.O. Nahata College in Bhusawal भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची उसळली गर्दी


Crowd of students for first year admission in P.O. Nahata College in Bhusawal भुसावळ  : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविडच्या काळात महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली होती परंतु महाविद्यालयात प्रवेश घेणारा बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने बर्‍याचशा विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, नेट मिळत नाही आणि म्हणून प्रवेश घेत असताना अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी महाविद्यालयाने आता ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

भुसावळात सर्व्हिस रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा
प्रथम वर्ष कला, वाणिज्य,विज्ञान, बी.बी.ए., बी.एम.एस., या सर्व वर्गांसाठी प्रवेश ऑफलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील बहुतांश विद्यार्थी प्रवेश घेत असून विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी महाविद्यालयाच्या वाचन कक्षात प्रवेश समितीचे सर्व सदस्य विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे मार्गदर्शन करीत आहेत. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेशाचे 60 ते 70 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले असून महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रवेश समितीचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.एन.ई.भंगाळे व प्रवेश समितीचे सर्व सदस्य आणि प्राजक्ता बागुल यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !