Morcha at Yawal यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
Morcha at Yawal Integrated Tribal Project Office यावल : यावल पंचायत समितीच्या आवारात मंगळवार सकाळी जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाजबांधवांनी एकत्र येत तेथून थेट पायी कात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी कार्यालयात प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना समाज बांधवांनी निवेदन दिले.
कोळी समाज बांधवांसोबत भेदभावाचा आरोप
कोविड 19 च्या काळात महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी समाजाच्या नागरीकांना खावटी कर्ज देण्यात आले व अन्नधान्याचे किट वितरण करण्यात आले मात्र या योजनेपासून आदिवासी कोळी समाजाला वंचित ठेवण्यात आले आहे. एकूणच आदिवासी कोळी समाज बांधवांसोबत आदिवासी प्रकल्प कार्यालय भेदभाव करीत असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच कार्यालयातून जिल्ह्यात गावनिहाय खावटी कर्ज वितरण केल्याची माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी कोळी समाजबांधवांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून दिल्या जाणार्या विविध योजनांचा शासन परीपत्रकानुसार लाभ दिला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेप्रसंगी आदिवासी कोळी समाजाचे अॅड.गणेश सोनवणे, अॅड.विशाल सोनवणे, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, पाडळसा गामपंचायत सदस्य खेमचंद कोळी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी, पिंप्री सरपंच मोहन सपकाळे, अॅड.शरद तायडे, योगेश कोळी, चेतन सोनवणे, अनिल कोळी, जितेंद्र कोळी, लखीचंद बाविस्कर, नामदेव आप्पा ऐडवे, डॉ.गोकुळ कोळी, उमाकांत वाणी, अरविंद साळवेंसह समाजबांधव उपस्थित होते.