Cancel The Itarsi Memo Today And Tomorrow प्रवाशांना इकडे लक्ष द्या : आज व उद्या इटारसी मेमू रद्द
Cancel The Itarsi Memo Today And Tomorrow भुसावळ : 11077 भुसावळ-कटनी ही गाडी गुरुवार व शुक्रवारी (7 व 8 जुलै) कटनी ऐवजी केवळ खंडवा स्थानकापर्यंत धावणार आहे तर बुधवार व गुरुवारी (6 व 7 जुलै ) 11116 व 11116 भुसावळ-इटारसी मेमू रद्द करण्यात आली आहे. यामुळे भुसावळातून सावदा, रावेर, बर्हाणपूर येथे अप-डाऊन करणार्या नोकरदारांची गैरसोय होणार आहे. तर कटनीपर्यंत जाणार्या प्रवाशांना केवळ खंडव्यापर्यंत प्रवास करता येईल.
पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस : हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले
कटनी गाडी खंडवापर्यंत धावणार
भुसावळ स्थानकातून सुटणारी 11077 भुसावळ-कटनी एक्सप्रेस गाडी 7 व 8 जुलै रोजी कटनी स्थानकाऐवजी केवळ खंडवा स्थानकापर्यंत धावेल. परतीच्या प्रवासात 11028 कटनी-भुसावळ एक्सप्रेस खंडवा येथून तिच्या नियोजित वेळेवर सुटेल. दोन दिवस खंडवा ते कटनीदरम्यान एक्स्प्रेस रद्द होईल. तर 11115 भुसावळ-इटारसी मेमू बुधवार व गुरुवारी रद्द केली आहे. परतीच्या प्रवासात मेमू क्रमांक 11116 इटारसी-भुसावळ मेमू गाडी 7 व 8 जुलै रोजी रद्द राहील. प्रवाशांनी या नुसार नियोजन करावे, असे प्रशासनाने कळवले आहे.
