रेल्वे कर्मचा-याचे दागिने लांबविले


धुळे : शहरातील रेल्वे स्थानकावर विद्युत संकेत अनुरक्षक म्हणून नोकरी करणाजया गौरवकुमार पी. महेंद्रकुमार यांच्या रेल्वे क्वॉर्टरमधून सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत़ ही घटना 24 जुलै रोजी सकाळी 6 ते 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली आहे़ चोरट्याने 30 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि 12 हजार रुपये किंमतीची 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरुन नेली आहे़ आठ दिवसानंतर हा प्रकार लक्षात आल्याने शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे़ तक्रार दाखल झाल्याने चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़


कॉपी करू नका.