‘निर्मल’ दातृत्व : भुसावळकरांसाठी वैकुंठ वाहिनीचे लोकार्पण
भुसावळ : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले भुसावळातील साई सेवक तथा माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी नवीन वैकुंठवाहिनी आणल्यानंतर तिचे गुरुवारी डॉ.विकास कोळंबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी गेल्या 15 वर्षांपासून कोठारी यांनी वैकुंठवाहिनी मोफत सुरू केली होती व पुन्हा नवीन गाडीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
समाजाचं देणं लागतो : निर्मल कोठारी
आपणही समाजांचे देणं लागतो व गोर-गरीब लोकांच्या दुखाःत आपणही समरत व्हावे या उदात्त भावनेतून दुसरी वैकुंठवाहिनी सुरू केल्याची भावना कोठारी यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ.कोळंबे यांनी सुध्दा कोठारी यांच्या समाजसेवेचे कौतुक कीत कोठारी यांचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी निर्मल कोठारी, नाना भालेराव, क्रीश कोठारी, गजानन चव्हाण, भैय्या ठाकूर, बाबू राजपूत, ओम फालक यांच्यासह कोठारी मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येन उपस्थित होते.
