रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली प्रेसिडेंटपदी नूतन फालक
Nutan Phalak as Rotary Club of Bhusawal Tapti Valley President भुसावळ : भुसावळ रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचा पदग्रहण सोहळा रविवारी रोटरी हॉलमध्ये झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष नूतन फालक यांनी मावळते अध्यक्ष संजू भटकर यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. तर माजी सचिव सुधीर शर्मा यांनी मनीषा पाटील यांना सचिवपदाची सूत्रे सोपवली.
किनगावातील सिरीयल किलरला दुसर्या खून प्रकरणात अटक
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.निखीलेश त्रिवेदी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, सहायक प्रांतपाल विकास पाचपांडे उपस्थित होते. भुसावळ शहरातील रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी डॉ.निखीलेश त्रिवेदी यांनी व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नूतन फालक यांनी मावळते अध्यक्ष संजू भटकर यांच्याकडून अध्यक्षपदाची धुरा स्विकारली. सुधीर शर्मा यांनी मनीषा पाटील यांना सचिव पदाची सूत्रे सोपवली. मोहन फालक यांनी रोटरी क्लब नेहमी समाज हिताची कामे करत असतो, असे सांगून क्लबच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. रोट्रॅक्ट क्लबच्या अपूर्वा फेगडे, रीया चांदवणी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी अध्यक्ष धमेंद्र मेंडकी,किशोर पाचपांडे यांचे सहकार्य लाभले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी रजनी सावकारे, कमल सचदेव, डॉ.संगीता चांडक, अलका भटकर, रुचिका शर्मा, वंदीता पारे, स्वाती देव, स्मिता फालक, कल्पना फालक, प्रा. माधुरी गुजर, शोभा भोळे, प्रभा पाटील, ममता ठाकूर, प्रतीक्षा पाटील, सुनीता पाचपांडे, मीनाक्षी धांडे, ममता फालक, जी.आर.ठाकूर, राजेश अग्रवाल, महेश भराडे, संजय चांडक, प्रसन्न पांडे, भूषण महाजन, हिरामण फालक, सुधीर पाटील, अक्षय फालक, प्रवीन पाटील, रवींद्र ठाकूर यांच्यासह सर्व क्लबचे सदस्य उपस्थित होते.