30 Gates of Hatnur Dam Opened हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले


30 Gates of Hatnur Dam Opened भुसावळ : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाच्या उगम क्षेत्रात बुधवारी दिवसभरात झालेल्या दमदार पावसानंतर धरणात पाण्याची आवक वाढताच तनूर धरणाचे 30 दरवाजे पहाटे चारला उघडण्यात आले तर तब्बल सहा तास दरवाजे उघडे ठेवल्यानंतर सकाळी नऊ वाजता 16 दरवाजे तर दुपारी चारला आठ दरवाजे धरणाचे बंद करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आठ दरवाजे एक मीटर उंचीने उघडे ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

धक्कादायक  ! : भाषण सुरू असतानाच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झाडल्या गोळ्या

धरणाच्या जलपातळीत वाढ
मध्य प्रदेशात बुधवारी पाऊस झाल्याने तापी नदीपात्रातील या पाण्यामुळे हतनूर धरणातील पाणी पातळी वाढली आहे. धरणातील जलसाठा वाढल्याने हतनूर धरणाचे गुरुवारी पहाटे चार वाजता 30 दरवाजे हतनूर प्रशासनाने उघडले. यामुळे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला. तापी नदीच्या पूलावर नदीचे पाणी पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. दरम्यान, पाण्याची आवक कमी झाल्याने सकाळी नऊ वाजता धरणाचे 16 गेट बंद करण्यात आले दुपारी चारला सहा गेट बंद करण्यात आल्याने धरणाच्या आठ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू होता.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !