निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू


भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील दत्तनगरातील रहिवासी, रेल्वेतील निवृत्त कर्मचारी तथा माजी सैनिक सुभाष मन्साराम चौधरी (वय 63) हे रविवारी नेहमीप्रमाणे वांजोळा रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नात असा परिवार आहे. नीलेश व प्रीतेश चौधरी यांचे ते वडील होत. चौधरी यापुर्वी सैन्यात नोकरीला होते. तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी रेल्वेत नोकरी केल्यानंतर ते निवृत्त झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !