साकळीच्या रेशन दुकानदाराचा मृत्यू : अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
Morning ration shopkeeper killed : Crime against unidentified driver यावल : तालुक्यातील साकळी येथील रेशन दुकानदार अशोक पद्माकर नेवे (52) यांचा दुचाकी अपघातात सोमवार, 4 रोजी मृत्यू झाला. नेवे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात यावल पोलिसात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
धावत्या रेल्वेतच प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट
अज्ञात वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध
सोमवारी दुपारी यावल येथे स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन पार पडल्यानंतर दिवसभरात नेवे यांनी आपली खासगी कामे आटोपली व सायंकाळी दुचाकीने (एम.एच.19 डी.एक्स.5482) वरून अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गावरून साकळीकडे निघाले असता यावल शहराबाहेर वढोदा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देवून पळ काढला होता तर या अपघातात नेवे यांचा मृत्यू ओढवला होता. नेवे यांच्या मृत्यू प्रकरणी चंद्रकांत पद्माकर नेवे (58) यांच्या फिर्यादीनुसार यावल पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.
