रेल्वे अॅपबाबत जनजागृती : एकाच दिवसात दोन हजारांनी डाऊनलोड केले अॅप
भुसावळ : जनरल तिकीट विक्रीला अलिकडेच सुरूवात झाल्यानंतर रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. या अनुषंगाने रेल्वे तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागत आहेत मात्र प्रवाशांची गैरसोय दूर होवून त्यांना वेळेवर प्रवास करता येण्यासाठी रेल्वेने जनरल तिकीट अॅप (युटीएस अॅप) लाँच केले असून त्याबाबत रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. भुसावळ विभागात 27 पथकांद्वारे याबाबत जनजागृती करण्यात आल्यानंतर दोन हजार दोनशे प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड केले आहे.
अप विदर्भ एक्स्प्रेसमध्ये अमळनेरच्या तोतया तिकीट निरीक्षकाला पकडले
27 टिमद्वारे जनजागृती
भुसावळचे डीआरएम एस.एस.केडिया, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागाचे वाणिज्य निरीक्षक आणि तिकीट निरीक्षक यांनी संयुक्तपणे भुसावळ विभागात 27 टीम तयार केल्या. त्यात भुसावळ ते ईगतपुरी, अमरावती ते भुसावळ, खंडवा-भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव विभाग एक अॅपचा प्रचार करण्यात आला. भुसावळ-ईगतपुरी मेमू, भुसावळ-बडनेरा मेमू आणि भुसावळ-खंडवा या गाड्यांमध्ये प्रवाशांशी संवाद साधून त्यांना युटीएस अॅपचे महत्व सांगण्यात आले तसेच शाळा-महाविद्यालयातही जनजागृती करण्यात आली. भुसावळ मंडळाच्या सीसीआय, सीटीआय, सीबीएस, वाणिज्य विभागातील कर्मचार्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. एका दिवसात दोन हजार 203 प्रवाशांमध्ये मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्यात आले.
