भुसावळात मोहित नगरात घरफोडी


Burglary In Mohit Nagar In Bhusawal भुसावळ : शहरातील मोहित नगरातील रहिवासी मोती राणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा चोरट्यांनी रात्री तोडला मात्र घरात काहीच नसल्याने आणि बाजूचे लोक उठल्याने चोरट्यांना काढता पाय घ्यावा लागला. कुलूप तोडण्यासाठी आणलेली लोखंडी टामी तेथेच पडल्याचे दिसून आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोर्‍यांसह घरफोड्या होत असल्याने व जुन्या चोर्‍यांचा तपास लागत नसल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भुसावळातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार : सावदा रेल्वे स्टेशन प्रबंधकाविरोधात गुन्हा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !