Shiv Sena chief Uddhav Thackeray मातोश्रीवरील बैठकीकडे सहा खासदारांनी फिरवली पाठ


Six MPs turned their backs on the meeting on Matoshri मुंबई  : शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी सोमवारी खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्याने आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. सहा खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. राज्यातील 48 जागांपैकी शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत. या खासदारांपैकी एकूण 12 खासदार आजच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित होते तर सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने नवीन चर्चांना तोंड फुटले आहे.

सहा खासदारांची अनुपस्थितीची अधिक चर्चा
सहा खासदार नेमक्या कुठल्या कारणामुळे अनुपस्थित आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही मात्र, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते सुद्धा या बंडात सहभागी झाले आहेत तर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पक्षाने प्रतोद पदावरून काढल्याने ते सुद्धा शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार हजर झाले आहे. शिवसेनेचे खासदार उशिराने गैरहजर झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता शिवसेनेच्या एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 13 खासदार बैठकीला उपस्थित तर 6 खासदार अनुपस्थित होते.


बैठकीला उपस्थित खासदार
सेनेच्या बैठकीला गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशीव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर व राजेंद्र गावीत यांची बैठकीला उपस्थिती होती

शिंदे गटातील 16 आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा : ‘तो’ पर्यंत कारवाई नाहीच

बैठकीला अनुपस्थित खासदार
1. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
2. परभणी – संजय जाधव
3. हिंगोली – हेमंत पाटील
4. कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे
5. रामटेक – कृपाल तुमाने
6. कोल्हापूर- खासदार संजय मंडलिक
दरम्यान, खासदार मंडलिक हे पक्ष प्रमुखांच्या आदेशाने दिल्लीतील बैठकीला गेल्याची माहिती आहे.

राज्य सभेतील उपस्थित खासदार
संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी

आधी प्रेयसीला लॉजवर आणले अन् मध्यरात्री घडले असे काही की…!


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !