रावेरातील दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : तत्कालीन गटविकास अधिकार्यांची तीन तास कसून चौकशी
Corruption case of Rs 1 crore in Ravera: Three hours thorough investigation of the then group development officer रावेर : रावेर पंचायत समितीच्या शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची तब्बल तिन तास चौकशी करून तपास अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला.
तीन तास सखोल चौकशी : नंतर नोंदवला जवाब
वैयक्तीक शौचायल योजनेत दिड कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याने याबाबत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आठ आरोपी अटकेत असून अनेक जणांवर अटकेची टांगती तलवार आहे. सोमवारी बीडीओ दीपाली कोतवाल यांची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना योजना संदर्भातील विविध माहिती तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी जाणून घेऊन जबाब नोंदवला.
