भुसावळातील शिक्षकांचा उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान
भुसावळ : गुरुपार्णिमेचे औचित्य साधून बुधवार, 13 रोजी शहरातील गुरुजणांचा सन्मान कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. बधुवारी सायंकाळी पाच वाजता जामनेर रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात शहरातील शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.