ऐनगावच्या युवकाची रेल्वे समोर आत्महत्या
Angaon youth commits suicide in front of train बोदवड : तालुक्यातील ऐनगाव येथील सुरेश प्रकाश तायडे (27) या युवकाने धावत्या रेल्वेसमोर येत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बोदवड पोलिसात नोंद
सुरेश तायडे या तरुणाने मंगळवारी दुपारी दिड वाजता कोल्हाडी शिवारातील खांबा क्रमांक 479/02 जवळ कुठल्यातरी धावत्या रेल्वे समोर येत आत्महत्या केली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अनिल अशोक गवई यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सचिन चौधरी करीत आहे.
