जिल्हा परीषदेसह पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीला स्थगिती


Postponement of reservation draw of Panchayat Samiti Gana with Zilla Parishad मुंबई : पालिका निवडणुकांबाबत गोंधळाचे वातावरण असतानाच बुधवारी निघणार्‍या जिल्हा परीषदेच्या गटासह पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थागिती दिल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका लांबल्या
राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक होत असून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला होतर जिल्हा परीषदांच्या निवडणुकीसाठी बुधवार, 13 जुलै 2022 रोजी आरक्षण सोडत निघणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले मात्र मंगळवारी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट निकाल देणे टाळतांना याबाबत मंग्ळवार. 19 जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने जिल्हा परीषदेच्या गट आणि पंचायत समितींच्या गणांचे बुधवार, 13 जुलै रोजी निघणार्‍या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. यात 25 जिल्हा परिीषदा आणि 284 पंचायत समित्यांमधील आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परीषद निवडणूक पुढे ढकलली जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


ब्रेकींग न्यूज : राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका जाहीर तारीखेलाच होणार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !