भुसावळात तक्रारीनंतर अखेर लोंबकळणार्या वीज तारांची दुरुस्ती
भुसावळ : शहरातील जळगांव रोड विभागातील अयोध्या नगर ते हुडको कॉलोनी परिसराला जोडणार्या रस्त्याच्या मध्यभागी वीज तारा सहा ते सात फुटाच्या अंतरावर लोंबळकत होत्या. या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास येताच, लोंबळकणार्या वीज तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी महावितरणकडे केली होती. मागणीची दखल घेत मंगळवार, 12 जुलै रोजी या सर्व लोंबळकणार्या वीज तारांना 30 फूट उंचीवर बसवण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी किशोर तळेले, अजय जगताप, धर्मा चव्हाण, मयूर अमोदकार, अमोल पाटील, सुधाकर वाणी, किशोर कोळी व अन्य नागरीक उपस्थित होते. अनेक वेळेस मोठी वाहने या ठिकाणाहून रहदारी करीत होते, याठिकाणी वीज तारांना स्पर्श होतास मोठा घात झाला असता म्हणून त्वरित महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा करून ही समस्या सोडवली, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.
