गुरु अमृताचा कुंभ : संत गोपाल चैतन्यजी महाराज

पाल येथील श्री वृन्दावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त पन्नास हजारांवर साधकांनी घेतले दर्शन


रावेर : गुरू हे अमृताचे कलश असून शिष्याला अमरत्व प्रदान करण्याचे महान कार्य करीत असून मनातील विषरूपी विकाराला ज्ञान रूपी आध्यत्मिक तेजाने वाहून भक्ताचे जीवन मान उंचावण्याचे कार्य करीत असल्याचे विचार संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी व्यक्त केले. बुधवारी पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त देशभरातून आलेल्या भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

50 हजारांवर भाविकांची उपस्थिती 
परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पादुकांचे प्रसंगी पूजन करण्यात आले तर दिवसभर दर्शनासाठी राज्या-परराज्यातील भाविकांची गर्दी झाली होती. महोत्सवात महाराष्ट्रासह पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान अश्या विविध राज्यातून किमान पन्नास हजारांवर भाविकाींच उपस्थिती होती.


लोकप्रतिनिधींनी लावली हजेरी
गुरुपौर्णिमेनिमित्त रावेरच्या खासदार रक्षा खडसे, रावेर-यावलचे आमदार शिरीष चौधरी, खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, माजी खासदार हरीभाऊ राठोड, खासदार प्रतिनिधि नंदा ब्राह्मणे, धनंजय चौधरी, भरत महाजन, राजेश वानखेडे, अजीत पाटील, रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पालचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, माजी पोलिस उपनिरीक्षक कैलास पाटील आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात चैतन्य सेवा सेक्युरीटी संघ, भोजन समिती, पदयात्रा समिती, सुरक्षा समिती, पार्किंग समिती, आरोग्य समिती, प्रवेशपत्र सेवा समिती, जल सेवा समिती, वीज समिती यासह विविध समितीच्या पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. विद्यमान गादिपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांचा सत्संग व गुरुदीक्षाचा कार्यक्रम झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !