यावल शहरातील महर्षि व्यास मंदिरात भाविकांची मांदियाळी


Devotees at the Maharshi Vyas Temple in Yawal यावल : गुरूपौर्णिमेनिमित्त बुधवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली.

तब्बल दोन वर्षानंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह
पुणे येथील अमृता अजनाडकर व सौरभ अनंत अजनाडकर, संभाजी नगरातील सीमा व नितीतन भिकाजी कुळकर्णी, मोहराळे येथील नंदा व गोपाळ मंगु महाजन, धानोरा, ता.चोपडा येथील उर्मिला व संतोष गोपाळ पाटील व ऐनपूर, ता.रावेर येथील कोमल व पंकज विठ्ठल महाजन या पाच जोडप्यांचा समावेश होता. या जोडप्यांच्या हस्ते मंदिराचे पुजारी अतुल बाविसे, सारंग बाविसे, मोरेश्वर बयानी, महेश बयानी, सुनील जोशी, बिल्लु महाराज, त्रिभुवनदास बैरागी, हेमंत मुळे, मनीष बैरागी, भूषण कुळकर्णी, राजेंद्र बयानी, प्रसाद कुळकर्णी व अर्थव बयानी या ब्रम्हवृंदाची संपूर्ण पूजा केली. मंदिर दर्शना करीता खुले करण्यात आले व आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. बुंदी व तिखट भाताचा महाप्रसाद हजारो भाविकांना वितरीत करण्यात आला. भाविकांना दर्शनार्थ अडचणी येवु नये याकरीता सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


श्री जनार्दन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात
यावल : शहरातील न्यायालयाच्या मागील बाजुस असलेल्या श्री जनार्दन स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर भाविकांनी येथे दर्शनार्थ गर्दी केली. सकाळी श्री जनार्दन स्वामी मूर्ती अभिषेक जनार्दन निगडे व दिनेश पवार यांच्याहस्ते झाला. यावल शहरातील मेन रोडवर असलेल्या श्री साईबाबा मंदिरात देखील गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी वढोदा येथील भजनी मंडळींनी विविध भजन सादर केले.

श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर
गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री क्षेत्र सातपुडा निवासनी आई मनुदेवी मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानतर्फे संस्थेचे सदस्य नितीन भास्कर पाटील व मीना पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, कर्मचारी वर्गात आर.के.पाटील, समाधान पाटील, दगडू महाराज आदींची उपस्थिती होती.

तोतया सीबीआय पोलिसांची चौकडी शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !