रावेर तालुक्यात दमदार पावसाने रब्बी पिकांना फायदा
रावेर : रावेर शहर व तालुक्यात दमदार पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. रावेर तालुक्यात सकाळपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली तर दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे तालुक्यात कुठेही नुकसान झाले नाही. बुधवारी दुपारपासून या हंगामात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. रावेर तालुक्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.